Crime News: ‘दृश्यम स्टाईल’मध्ये भावाला संपवलं.. 45 ट्रॉली मातीखाली गाडलेले सत्य बाहेर! भावानेच रचलेला क्रूर कट उघड अन्..

वडिलांच्या मालमत्तेच्या वाटणीसाठी बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या स्वाक्षरीची गरज भासल्याने पोलिसांनी गावामध्ये शोध सुरू केला आणि या धक्कादायक हत्येचा कट उघड झाला.

Crime News: ‘दृश्यम स्टाईल’मध्ये भावाला संपवलं.. 45 ट्रॉली मातीखाली गाडलेले सत्य बाहेर! भावानेच रचलेला क्रूर कट उघड अन्..

Worker's Brother Killed him and Dead body buried: कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील सिरा परिसरात एका बेपत्ता झालेल्या 40 वर्षीय मेस्त्रीच्या प्रकरणाचा तपास करताना हत्येचा थरारक कट उघडकीस आला आहे. कमलनायकनहळ्ळी तांडा येथील रहिवासी असलेला रविचंद्रनाईक हा बांधकाम कामगार अचानक 2 महिने बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांकडून तो कामाच्या निमित्ताने बाहेर गेल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, वडिलांच्या मालमत्तेच्या वाटणीसाठी त्याच्या स्वाक्षरीची गरज भासल्याने पोलिसांनी गावामध्ये शोध सुरू केला आणि या धक्कादायक हत्येचा आणि बेपत्ता झाल्याचा बनाव उघड झाला.

अनैतिक संबंध अन् कौटुंबिक वादातून सख्या भावाने केला घात
तपासादरम्यान पोलिसांना रविचंद्रनाईकची पत्नी सावित्रीबाई आणि त्याचा मोठा भाऊ राजा नाईक यांच्यातील अनैतिक संबंधांची माहिती मिळाली. 2 एप्रिल 2022 रोजी दारूच्या नशेत घरी परतलेल्या रविचंद्रनाईकचा याच कारणावरून पत्नीशी जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेला असता राजा नाईकने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. यावेळी सावित्रीबाईने पतीचे हात-पाय घट्ट पकडून ठेवले, तर राजा नाईकने त्याच्या छातीवर पाय देऊन त्याला जबर मारहाण केली, ज्यामध्ये रविचंद्रनाईकचा जागीच मृत्यू झाला.

5 फूट खोल खड्ड्यात मृतदेह; त्यावर 45 ट्रॉली माती टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
हत्येनंतर गुन्ह्याची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी अत्यंत क्रूर मार्ग निवडला. घरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या राजा नाईकच्या बांधकाम सुरू असलेल्या जागेवर मृतदेह नेण्यात आला. तेथे आधीच खोदलेल्या 5 फूट खोल खड्ड्यात मृतदेह टाकून त्यावर बांधकामासाठी मागवलेली सुमारे 40 ते 45 ट्रॉली माती टाकून तो पूर्णपणे पुरून टाकण्यात आला, जेणेकरून कोणालाही कसलाच संशय येणार नाही.

हेही वाचा – Nagpur Crime New: नागपूर हादरलं! वाढदिवसाच्या आनंदावर विरजण, केक कापल्यानंतर दोन गटात तुफान राडा; तरुणावर धारदार शस्त्राने वार

3 जून 2022 रोजी जेसीबीने खोदकाम; डीएनए (DNA) चाचणीने पटली ओळख
रविचंद्रनाईकचा काहीच पत्ता लागत नसल्याने पोलिसांचा संशय बांधकामाच्या जागेकडे वळाला. अखेर तहसीलदारांच्या उपस्थितीत 3 जून 2022 रोजी जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात माती हटवून उत्खनन करण्यात आले, जिथे मानवी सांगाडा व अवशेष सापडले. मृतदेहाची अचूक ओळख पटवण्यासाठी रविचंद्रनाईकच्या मुलाचे रक्ताचे नमुने घेऊन न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत (FSL) डीएनए प्रोफाइलिंग करण्यात आले, जे अवशेषांशी जुळले. याशिवाय मुलांनी सीआरपीसी (CrPC) कलम 164 अंतर्गत दिलेला जबाब या प्रकरणात निर्णायक पुरावा ठरला.

पूर्वीच्या हत्या प्रकरणातून सुटलेला राजा नाईक पुन्हा जाळ्यात
तपासात राजा नाईकची गुन्हेगारी पार्श्वभूमीही समोर आली आहे. यापूर्वी 2019 मध्ये स्वतःच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता, परंतु पुराव्यांभावी त्याची न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाली होती. मात्र, यावेळी डीएनए अहवाल, न्यायवैद्यकीय पुरावे, छायाचित्रे आणि मुलांच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीच्या आधारे न्यायालयाने राजा नाईक व सावित्रीबाई यांना दोषी ठरवले आहे.

हेही वाचा – Star Mall Dadar: दादरच्या स्टार मॉलमध्ये स्पाच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय! पोलिसांची धाड, 6 तरुणींची सुटका

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number